बातम्या

पिगमेंट व त्वचेवरील वांग

Pigmentation and skin pigmentation


By nisha patil - 11/16/2023 9:09:19 AM
Share This News:



त्वचेवरील वांग जाण्यासाठी ऍपल साइडर व्हिनेगरचा वापर करू शकता. एका बाऊलमध्ये ऍपल साइडर व्हिनेगर घेऊन त्यात थोडे पाणी मिसळून हे मिश्रण वांग असलेल्या भागावर लावावे.

दोन ते तीन मिनीटनंतर चेहरा स्वच्छ कोमट पाण्याने धुऊन टाकावा. फरक जाणवेल. यामुळे त्वचेवरील काळे डाग कमी होतात यात एसिडिटीक ऍसिड असल्याने पिग्मेंटेशनला कमी करतो.

टोमॅटोची पेस्ट
टोमॅटोमध्ये असलेले लाइकोपिन पिग्मेंटेशन होण्यापासून वाचवतो.

कोरफड
कोरफड मध्ये एलोइन नावाचा गुणधर्म असतो, जो नैसर्गिक डिप पिगमेंटिग आहे. हा त्वचेचा रंग हलका करतो. हायपर पिगमेंटेशनसाठी उपयुक्त आहे. रात्री झोपण्यापूर्वी एलोवेरा जेल त्वचेवरील डागाच्या जागेवर लावावे. सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.

लाल मसूरची डाळ
चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी मसूर डाळ गुणकारी आहे. मसूर डाळीपासून बनवलेला फेसपॅक चेहऱ्याला लावावा.

मध व लिंबू
लिंबाच्या रसात विटामिन सी असल्याने चेहऱ्यासाठी अतिशय फायद्याचे आहे. एक चमचा मध घेऊन त्यात लिंबाच्या रसाचे दोन थेंब टाकून मिश्रण एकजीव करून चेहऱ्यावर वांग असलेल्या भागावर लावावे. किमान 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. हळूहळू फरक जाणवेल. केळी-दूध-मध या मिश्रणानेसुद्धा चेहऱ्यावरील डाग जाण्यास मदत होते.

कच्चा बटाटा
त्वचेवरील काळवटी जाण्यासाठी बटाटा अतिशय गुणकारी मानला जातो. बटाटा किसून त्यात दोन थेंब लिंबूचा रस टाकून मिश्रण करून हे मिश्रण वांग आलेल्या भागावर लावा सुकल्यावर धुवून टाकावे महिन्यातून दोन-तीन वेळा हा उपाय करू शकता.

काही अन्य उपाय:
स्किन स्पेशलिस्ट डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन लगेच ट्रीटमेंट चालू करावी किंवा ब्युटी एक्‍सपर्ट कडून चांगल्या दर्जाचे फेशियल, फेस पॅक, पिग्मेंटेशन ट्रीटमेंट घेऊन त्वचेवरील वांग कमी होऊ शकते. मात्र, हे उपचार करताना स्वच्छतेची योग्य ती काळजी अवश्‍य घ्यावी.


पिगमेंट व त्वचेवरील वांग