बातम्या
शहाजी महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण व ॲकॅडेमिक बँक क्रेडिटवर अग्रणी कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 2/14/2024 2:44:08 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण व ॲकॅडेमिक बँक क्रेडिटवर अग्रणी कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर:श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व ॲकॅडेमिक बँक क्रेडिटचा अवलंब या विषयावर एकदिवशीय अग्रणी कार्यशाळा संपन्न झाली. शिवाजी विद्यापीठ अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक व मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम एस देशमुख यांचे बीज भाषण झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी होते. सुरुवातीस रोपास पाणी घालून या कार्यशाळेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.
डॉ.एम एस देशमुख म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षक आणि प्रशासनावर आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी माहितीपत्रके तयार करावेत, स्कूल कनेक्ट सारखे अभियान राबवावे व विद्यार्थ्यांना अधिकाधिक माहिती द्यावी. या धोरणात विद्यार्थ्यांना कौशल्याधारित अभ्यासक्रमाचीही मुभा देण्यात आली आहे. तसेच आंतरवासिताही अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याधरित करण्याची जबाबदारी महाविद्यालयावर आहे.
विवेकानंद महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. सिद्धार्थ कट्टीमणी यांनी आपल्या महाविद्यालयात याची अंमलबजावणी गतवर्षीपासून कशी केली आणि त्यात आलेल्या अडचणी यांची माहिती सविस्तरपणे सांगितली.
डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स च्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. शिवलिंग राजमाने यांनी ॲकॅडेमिक बँक क्रेडिट विद्यार्थ्यांसाठी कसे उपयुक्त आहे याबाबत विवेचन केले. महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे यांच्या हस्ते कार्यशाळेतील सहभागी प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. ए. बी.बलुगडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ आर. डी. मांडणीकर यांनी कार्यशाळेचा आढावा घेतला. सूत्रसंचालन डॉ.सौ. एस. एस पाटील यांनी केले. डॉ. के. एम. देसाई यांनी आभार मानले. राजाराम कॉलेज मधील प्रा. डॉ. अंजली पाटील, स. ब. खाडे महाविद्यालयातील प्रा. मारुती हजारे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ एन. एस. जाधव, डॉ. सुनिता राठोड, डॉ. आर डी मांडणीकर यांनी कार्यशाळेतील विविध सत्रांचे अध्यक्षस्थान भूषवले. या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकीय सहकारी विद्यार्थी उपस्थित होते.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. मानसिंग बोंद्रे यांचे या कार्यशाळेस प्रोत्साहन मिळाले.
शिवाजी विद्यापीठ न्यू कॉलेज क्लस्टर, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा आयक्यूएससी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा संपन्न झाली .
शहाजी महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण व ॲकॅडेमिक बँक क्रेडिटवर अग्रणी कार्यशाळा संपन्न
|