विशेष बातम्या

IG ऑफिस पुण्याला नेण्याचा डाव हाणून पाडू: आ.सतेज पाटील

Plan to move IG office to Pune will be thwarted A Satej Patil


By nisha patil - 6/20/2023 5:34:51 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय पुण्याला हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत मुळात कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस आयुक्तालयाची मागणी होत असताना त्याची पूर्तता करण्याऐवजी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय पुण्याला हलवण्याचा शासनाचा हा डाव हाणून पाडू असा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलाय
कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 40 लाखांच्या आसपास आहे वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय होणे गरजेचे आहे यासाठी वेळोवेळी पाठपुराsवा केला असल्याचं पाटील यांनी पत्रकात म्हटलं. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय होण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतली होती आणि कोल्हापुरातून विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय स्थलांतरित होणार नाही अशी ग्वाही दिली होती मात्र सध्या पोलीस आयुक्तालय नाहीच पण आहे ते विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय पुण्याला नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत कोल्हापुरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय कोल्हापुरातून स्थलांतरित करण्यास आमचा ठाम विरोध असल्याची भूमिका आमदार सतीश पाटील यांनी घेतलीय.


IG ऑफिस पुण्याला नेण्याचा डाव हाणून पाडू: आ.सतेज पाटील