वास्तुशास्त्रातही या झाडांना शुभ मानलं जातं. या झाडांना घरी लावल्यामुळे आरोग्य आणि पैशाची समस्या दोन्ही दूर होतात. ही ५ रोपे घरातील कोणत्या बाजूस ठेवल्यास याचा जास्त फायदा होतो हे समजून घेऊया. घरात असलेल्या या रोपांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. वास्तुशास्त्रानुसार या झाडांमध्ये असलेली ऊर्जा उत्तम आरोग्यासाठी आणि पैशाच्या भरभराटीसाठी अतिशय फायदेशीर असते. ही रोपे घरातील कोणत्या दिशेत ठेवल्यास याचा अधिक फायदा होतो जाणून घेऊया.
क्रासुला ओवाटा
क्रासुला ओवाटा हे रोपं घरी लावणे अतिशय शुभ मानले जाते. वास्तुनुसार ज्या घरात हे छोटे झाड असते त्यांच्यावर लक्ष्मीचा विशेष आशिर्वाद तर असतोच सोबतच आरोग्य देखील उत्तम राहण्यास मदत होते. या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. फक्त हे झाडं अशा ठिकाणी ठेवाल जेथे सूर्याचा प्रकाश थेट येईल.
बांबू प्लान्ट
Webmd ने दिलेल्या रिपोर्टनुसार बांबूच्या झाडाचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स या झाडातून मिळते. एवढेच नव्हे तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. बांबू प्लान्टला आरोग्याच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. हे झाड घरात राहील सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण राहते. यामुळे निरोगी आरोग्य राहण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर यामुळे घरात पैसाही अतिशय खेळता राहतो. घरात सुख, शांती आणि समृद्धी राहण्यासही मदत होते. तसेच बांबूमध्ये अन्न देखील शिजवले जाते. यामुळे आरोग्याला सर्व आवश्यक पोषणतत्वे मिळण्यास मदत होते.
सफेद पलाश
सफेद पलाश आणि लक्ष्मणा ही दोन्ही रोपे आरोग्यासाठी अतिशय उत्तम समजली जाते. एवढंच नव्हे तर या रोपांनी घरात धनवर्षा होईल असे देखील वास्तुशास्त्रात सांगितले आहे. महत्वाचं म्हणजे पांढऱ्या पलाशने पुरूषांना अनन्य साधारण फायदे होतात. अगदी मधुमेह, त्वचा रोग, मुळव्याध आणि रक्त शुद्ध करण्यासाठी देखील पांढऱ्या पलाशचा फायदा होतो.
स्नेक प्लान्ट
Healthline च्या रिपोर्टनुसार, स्नेक प्लान्टमुळे वातावरणातील हवा अतिशय शुद्ध राहण्यास मदत होते. हे रोप एअर प्युरिफायर म्हणून काम करते. हे रोपं घरी लावल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी उत्तम राहते. एवढंच नव्हे तर वास्तुशास्त्रानुसार या झाडामुळे मनःशांती राहते आणि पैशाची चणचण कधीच भासू शकत नाही. हे रोप गुडलक म्हणून तुम्ही भेट म्हणून देखील देऊ शकता.
कोलोकॅसिया एस्कुलेंटा
हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार, कोलोकॅसिया एस्कुलेंटा किंवा तारो असं या झाडाला म्हटलं जातं. अगदी हत्तीच्या कानाएवढी मोठी याची पाने असतात. महत्वाचं म्हणजे या झाडामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण कंट्रोल होण्यास मदत होते. एवढंच नव्हे तर हार्टशी संबंधित सर्व आजार बरे होण्यास या रोपाची मदत होते. या झाडामुळे शरीराला आवश्यक ती सर्व पोषणतत्वे मोठ्या प्रमाणात असते. तसेच वजन कमी करण्यासाठी या झाडाचा वापर होतो.