बातम्या
मलकापूर, बांबवडे, शाहूवाडीतील प्रवाशांचे हाल निवारा शेडची मागणी .... प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त......
By nisha patil - 6/19/2024 1:14:40 PM
Share This News:
कोल्हापूर /वार्ताहर. दखनचा राजा जोतिबा यांच्या दर्शनासाठी तसेच कोल्हापूर ते मलकापूर, बांबवडे, शाहूवाडी तालुक्याच्या शेवटच्या टोकाला आणि तळ कोकणात जाण्यासाठी सी. पी. आर.दवाखान्या जवळील कोर्टानजीकचा प्रवाशी एस. टी. बस. थांब्यावर भर रस्त्यावरच प्रवाशी एस. टी. बसची वाट पाहत ताटकळत निवारा शेड अभावी उभारलेली असतात.
या थांब्याजवळ असलेले भलं मोठं झाड सोसाट वारा आणि पावसामुळे कधीही कोसळून पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्याच्या अनेक भागातून कोल्हापूर येथे कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांची प्रामुख्याने महिला यांची संख्या लक्षणीय आहे.तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या विध्यार्थी संख्या लक्षणीय आहे. यामध्ये अपंग व वयस्कर प्रवाशांची संख्या मोठी आहे. कोल्हापूर एस. टी. बस. विभागाला जादा उत्पन्न मिळवून देणारा हे दोन तालुके आहेत.
यांचबरोबर सी. पी. आर. दवाखान्यात उपचारासाठी आलेली रुग्ण यांना बसायला निवारा शेड नाहीच पण बसायला बाकडी यांची सुद्धा सोय केलेली नाही.
कोल्हापूर, पन्हाळा येथील लोकप्रतिनिधीनी आपल्या मतदारांसाठी (टाऊन हॉलशेजारी ) यामध्ये लक्ष घालून या ठिकाणी किमान पावसाळ्यात होणारी प्रवाशांची हेळसांड थांबावी यासाठी तात्पुरती निवारा शेडची उभारणी करावी अशी मागणी वजा विंनती प्रवाशी वर्गातून होतं आहे.
मलकापूर, बांबवडे, शाहूवाडीतील प्रवाशांचे हाल निवारा शेडची मागणी .... प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त......
|