बातम्या
शहाजी महाविद्यालयात काव्यवाचन व देशभक्तीपर गीत गायन उपक्रम संपन्न
By nisha patil - 8/14/2023 3:55:20 PM
Share This News:
कोल्हापूर: श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील शिवाजी ग्रंथालय आणि मराठी व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्तीपर गीत गायन आणि काव्यवाचन उपक्रम संपन्न झाला.
भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंती दिनाच औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता समारंभाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन आणि काव्यवाचन केले.40 विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला.
महाविद्यालयाचे प्रबंधक मनीष भोसले यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ग्रंथपाल डॉ.पांडुरंग पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. के.एम.देसाई ,डॉ.ए.बी.बलुगडे, डॉ.दीपककुमार वळवी, प्रा. अमर शेळके, डॉ.विजय देठे, बाळासाहेब इंगवले व विद्यार्थ्यांनी विविध कविता आणि देशभक्तीपर गीते सादर केले डॉ.सयाजीराव गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.मोहम्मद कैफ बागवान, सुरज जावीर, नंदकुमार कांबळे यांनी संगीत साथ दिली. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे, मानद सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.
शहाजी महाविद्यालयात काव्यवाचन व देशभक्तीपर गीत गायन उपक्रम संपन्न
|