विशेष बातम्या
पोलीस मित्र असोसिएशनतर्फे महिला आदर्श गौरव पुरस्कार वितरण
By nisha patil - 3/16/2025 11:09:30 PM
Share This News:
पोलीस मित्र असोसिएशनतर्फे महिला आदर्श गौरव पुरस्कार वितरण
इचलकरंजी : प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा पोलीस मित्र असोसिएशन आणि वेध सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना "आदर्श महिला गौरव पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
घोरपडे नाट्यगृह येथे झालेल्या या शानदार समारंभात माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, महापालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील, आयजीएम रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील, महिला व बाल विकास विभागाच्या अधिकारी निलम धनवडे, यशवंतराव चव्हाण आश्रमशाळा पुणेचे संचालक संदीप राक्षे आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतात पोलीस मित्र असोसिएशन आणि वेध फाउंडेशनने महिलांच्या कर्तव्यनिष्ठेची दखल घेऊन त्यांचा गौरव केल्याचे सांगून या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज मोरे, महिला राज्याध्यक्षा आणि वेध फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. रजनीताई शिंदे, राज्य संपर्कप्रमुख मुरलीधर शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
पुरस्कार सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिल्याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनच्या उज्वला कित्तूरे, आशा वाघिरे, वैशाली गडद, संगीता रुग्गे, सरस्वती हजारे, नितीन दबडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला इचलकरंजी प्रिंटिंग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष सिताराम शिंदे, पोलीस मित्र असोसिएशनचे पदाधिकारी मिलिंद चव्हाण, रुपाली ठोमके, अमित पाटील, सुनिता पवार, सविता पुजारी, सुनिता पाडळकर, स्वाती जाधव, राजश्री बडवे, मनिषा आवळे, मिनाक्षी पाटील, चंद्रकला शिंदे, राजश्री हंकारे, मीना भिसे, कृतिका शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा गायकवाड यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. रजनीताई शिंदे यांनी मानले.
पोलीस मित्र असोसिएशनतर्फे महिला आदर्श गौरव पुरस्कार वितरण
|