विशेष बातम्या

सध्या पोलीस करत आहेत या घटनेचा अधिक तपास

Police are currently investigating the incident further


By nisha patil - 10/6/2023 5:07:25 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  कोल्हापुरातील गगनबावडा मार्गावरील बालिंगा येथील दरोडा प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, दरोडेखोरांनी वापरलेल्या दोन दुचाकी घटनास्थळापासून काही किलोमीटर अंतरावर शेतात सोडल्या होत्या .या दुचाकी चार ते पाच दिवसांपूर्वी जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे तपासातून समोर आले असून, करवीर पोलिसांनी शुक्रवारी  त्या जप्त केल्या आहेत. 
गगनबावडा वरील बालिंगा इथल्या सराफ दुकानावर गुरुवारी दुपारी चार संशयितांनी गोळीबार करत दरोडा घालून दोन कोटींचा ऐवज लांबवला .अवघ्या आठ ते दहा मिनिटात दुकानातील दागिने आणि रोकड घेऊन पसार झाले.  दरम्यान चोरीला गेलेली दोन वाहने येवलुज येथील नागरिका स्पिनिंग मिल जवळ खुपिरे गावाकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावरवर मिळाली. त्याचबरोबर पोलिसांनी बालिंगा फाटा, येवलुज फाटा नागरिका स्पिनिंग मिल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतला असून फरार असलेल्या दरोडेखोरांच्या शोधासाठी करवीर पोलिसांची दोन तसेच स्थानिक अन्वेषण पथके रवाना केली आहेत.


सध्या पोलीस करत आहेत या घटनेचा अधिक तपास