बातम्या

सुपारीच्या राखेने चमकवा दात

Polish your teeth with betel nut ash


By nisha patil - 10/19/2023 7:19:52 AM
Share This News:




बहुतेक लोकांना
पान खायला
खूप आवडते, तर जे लोक पान खातात त्यांना सुपारी खायला देखील आवडते. तसेच काही लोक असे असतात ज्यांना भाजलेली सुपारी खायला खूप आवडते. तर ही सुपारी खायला जेवढी चविष्ट असते तेवढीच ती आपल्या दातांसाठी खूप फायदेशीर असते.

बहुतेक लोकांना दाताशी संबंधित अनेक समस्या सतावत असतात. तर दाताच्या या समस्या दूर करण्यासाठी सुपारी फायदेशीर ठरते. आता तुम्हाला सुपारीने दात कसे स्वच्छ करायचे असा प्रश्न पडला असेल.

सुपारीने दात स्वच्छ करण्यासाठी त्याची पावडर बनवणे आवश्यक आहे. त्यासाठी 10 सुपारी भाजून घ्या आणि त्याची पावडर बनवा. या तयार झालेल्या सुपारीच्या पावडरने तुम्ही तुमचे दात घासू शकता. तर आता आपण सुपारीच्या पावडरने दात घासण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. बहुतेक लोकांच्या हिरड्यांमधून रक्त येते. तर या समस्येवर उपाय म्हणून तुम्ही सुपारीची पावडर घासू शकता. काही लोकांच्या हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो त्यामुळे हिरडी दुखायला लागते. तर या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही सुपारीची पावडर घासू शकता. सुपारी मध्ये अँटीऑक्सिडंट्सचे गुणधर्म असतात जे हिरड्यांची समस्या दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे सुपारीची पावडर हिरड्यांसाठी फायदेशीर ठरते.

दातांसाठी सुपारीची पावडर घासण्याचे खूप फायदे आहेत. त्यामधील एक फायदा म्हणजे तुमचे पिवळे दात स्वच्छ करण्यास मदत होते. सुपारीमध्ये काही असे गुणधर्म असतात जे तुमचे पिवळे दात पांढरे करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही दातांवरती सुपारीची पावडर घासली तर दातांवरचा पिवळा थर निघून जातो आणि तुमचे दात मोत्यासारखे चमकण्यास मदत होते.

बहुतेक लोकांच्या तोंडातून दुर्ग॔धी येत असते. तर ही दुर्गंधीची समस्या कमी करण्यासाठी सुपारीची पावडर घासा. सुपारीच्या पावडरने दात घासल्यामुळे तोंडातील दुर्ग॔धी कमी होण्यास मदत होते. तसंच सुपारीच्या पावडरने दात घासल्यामुळे तुमचे तोंड स्वच्छ होते आणि दुर्गंधी देखील येत नाही.


सुपारीच्या राखेने चमकवा दात