बातम्या

वाढदिवसाच्या निमित्तानं मांडलं राजकीय गणित

Political math presented on the occasion of birthday


By nisha patil - 4/7/2024 8:03:56 PM
Share This News:



पुढच्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी हालचालींना सुरुवात केलीय. निवडणुकीच्या दृष्टीनं गाठीभेटी दौरे सुरु केले आहेत. अशातच कै. आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील  हे आज वयाची पंचविशी पूर्ण करत आहेत. वयाची  25 वर्ष पूर्ण झाल्यानं तोंडावर असंलेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांचा उतरण्याचा मार्ग देखील मार्ग मोकळा झालाय. त्यामुळं रोहित पाटलांनी यंदा तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारससंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह देखील कार्यकर्त्याकडून होत आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. तसेच लोकसभेच्या निवडणूकमध्ये शरद पवार यांच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस मोठा विजय खेचू शकल्याचे रोहित पाटील म्हणाले. येणाऱ्या काळात सुद्धा विधानसभेला आम्ही त्याच पद्धतीने सामोरे जाणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष राहिला पाहिजे असे आमचे उद्दिष्ट असल्याचे देखील रोहित पाटील यांनी म्हटलं.


वाढदिवसाच्या निमित्तानं मांडलं राजकीय गणित