बातम्या

कोल्हापूर, हातकणगले मतदारसंघात चुरशिने मतदानाला सुरुवात

Polling begins in Kolhapur Hatkangale constituencies


By nisha patil - 7/5/2024 12:46:57 PM
Share This News:



 कोल्हापूर – कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झालीय. नागरिकांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लावल्याचं चित्र  दिसून येतंय. सुरवातीला कर्मचाऱ्यांनी ईव्हिएम बाबत उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतदानाच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली.

त्यानंतर रीतसर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. काही ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी फिरायला गेल्यावर मतदान केलं. उन्हाचा कडाका जास्त असल्यानं सकाळच्या आणि संध्याकाळच्या टप्प्यात जास्त मतदान होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दोनवडे व पाडळी खुर्द इथं एक तास मशीन बंद असल्याची माहिती समोर येतीय. तर बालिंगा इथं मशीन जोडता न आल्यामुळ मतदान प्रक्रिया सुरु होणास विलंब झाल्याची माहिती मिळतीय.
  
कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी नवीन राजवाडा परिसरातील न्यू पॅॅलेस स्कूलमध्ये सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर हातकणंगले लोकसभेचे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथील जनता हायस्कूल इथं कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला.

★ आमदार जयश्रीताई जाधव यांच्या सासुबाई आणि स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मातोश्री प्रेमलाताई पंडितराव जाधव यांनी 93 व्या वर्षी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल या मतदान केंद्रामध्ये येऊन आज मतदानाचा हक्क बजावला. उत्स्फूर्तपणे मतदान केल्याबद्दल त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला.

★ सकाळी कोल्हापूर मतदारसंघात ११ वाजेपर्यंत झालेले मतदान –
 चंदगड – १७.६०%
कागल – १९.९८%
करवीर – २३.७१%
कोल्हापुर उत्तर – २२.६८%
कोल्हापूर दक्षिण – २८.०६%
राधानगरी -१९.५०%

★ आतापर्यंत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आ. सतेज पाटील, आ. जयश्री जाधव,नाम. हसन मुश्रीफ, आ. ऋतुराज पाटील, कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे, हातकणंगलेचे महायुतीचे उमेदवार खा.धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तीकेयन यांनी मतदान केलं.

★ नव मतदार- 
कोल्हापुरातील शाहूपुरी गवत मंडई इथल्या महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयात नंदिनी संतोष माजगांंवकर आणि श्रवण संदीप माजगांंवकर या नव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.


कोल्हापूर, हातकणगले मतदारसंघात चुरशिने मतदानाला सुरुवात