बातम्या

कोल्हापूर, सांगली ७ मे रोजी मतदान

Polling on Kolhapur Sangli on 7th May


By nisha patil - 3/16/2024 4:43:03 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सोलापूर आणि माढा या लोकसभा मतदारसंघात सात मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात २६ एप्रिल, सात मे, तेरा मे, वीस मे आणि २५ मे २०२४ रोजी मतदान होईल. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे.   केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक शनिवारी (सोळा मार्च २०२) जाहीर केली. देशात एकूण सात टप्प्यात निवडणूक होणार आहेत. १९ एप्रिल ते एक जून २०२४ या कालावधीत सात टप्प्यात देशामध्ये निवडणुका होतील.१९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात समाविष्ठ राज्यात मतदान होणार आहे.   चार जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान १६ जून २०२४ रोजी १७ व्या लोकसभेची मुदत संपणार आहे.

 मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीरसिंह संधू, ज्ञानेशकुमार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.  केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम झाहीर केला. यंदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण देशभरात मिळून ९६ कोटी ८८ लाख मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ४९ कोटीहून अधिक आहे. तर  महिला मतदारांची संख्या ४७ कोटीहून अधिक आहे.  २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशात निवडणूक होणार आहे. एकूण ५४३ जागासाठी निवडणूक आहे. ‘चुनाव का पर्व, देश का गर्व’सारखी आहे. देशातील निवडणुका या स्वतंत्र आणि निष्पक्ष वातावरणात होतील. देशात साडे दहा लाखहून अधिक मतदान केंद्राची सोय असणार आहे. ५५ लाखाहून अधिक ईव्हीएम मशिनची उपलब्धता आहे. जूनमध्ये सिक्कीम ओरिसा अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश राज्यातील निवडणुका होणार आहेत


कोल्हापूर, सांगली ७ मे रोजी मतदान