बातम्या
शिरढोण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
By nisha patil - 12/27/2023 8:16:25 PM
Share This News:
शिरढोण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामसभेची नोटीस नाही
शिरढोण (संजय गायकवाड)प्रतिनिधी/ता.२७ ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामसभेची नोटीस न दिल्याने शिरढोण तालुका शिरोळ येथील संतप्त ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामविकास अधिकारी दयानंद राऊ कांबळे यांना धारेवर धरत जाब विचारून ग्रामसभा रद्द केली दस्तुर खुद्द ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस नसल्याने ग्रामसभा घेण्याचा अजब प्रकार ग्रामसेवकाने केल्याने ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
नोव्हेंबर महिन्यात रद्द झालेली ग्रामसभा २७ डिसेंबर रोजी घेण्याचे ग्रामपंचायतीने नियोजन केले त्यानुसार१८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीने सरपंच व ग्रामसेवकांच्या सहीने नोटीस काढली पण प्रत्यक्षात ग्रामपंचायत सदस्यांना नोटीसच दिली गेली नाही. त्यापैकी तंटामुक्त अध्यक्ष व गावकामगार पोलीस पाटील यांना ग्रामसभेच्या आदल्या दिवशी नोटीस दिली आहे
नोटीस काढून दहा दिवस झाले तरी ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस न देण्यामागे कारण काय? नोटीस देण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना देखील प्रशासनाने गाफीलपणा दाखवला यापूर्वी देखील मतदान जागृती ग्रामसभा ग्रामपंचायतिने कागदोपत्री दाखवल्याने ग्रामस्थांनी याबाबत ग्रामसेवकाला धारेवर धरले होते असा भोंगळ कारभार चालू असून देखील गट नेते तोंडावर बोट ठेऊन गप्प आहेत ग्रामपंचायतीच्या सर्वच १७ सदस्यांना ग्रामपंचायतीची नोटीस नसून देखील ग्रामसभा घेण्याचे धाडस कसे दाखवले याबाबत ग्रामस्थातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे
रद्द झालेल्या ग्रामसभेची नोटीस काढली त्यामध्ये वाढीव विषय कसे घातले याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला धारेवर धरले.१४विषय असताना १९विषय झाले कसे असे विचारताच ग्रामसेवकाची बोबडी वळली.
शिरढोण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
|