बातम्या

भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी पोपट पुजारी

Popat Pujari as BJP Kolhapur District Vice President


By nisha patil - 12/28/2023 10:33:16 PM
Share This News:



भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी पोपट पुजारी
 

शिरढोण (संजय गायकवाड)/ता.२८ भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण (पूर्व )च्या उपाध्यक्षपदी पोपट उर्फ सातगोंडा दत्ता पुजारी (शिरढोण ता.शिरोळ)यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर ग्रामीणचे अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आले.
     

गेल्या बऱ्याच वर्षापासून पोपट पुजारी यांनी पक्ष वाढीसाठी तसेच समाजातील घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे याची दखल घेऊन पक्षाने त्यांची आज निवड केली. गाव, तालुका जिल्हा स्तरावर पक्ष वाढीसाठी व विस्तारासाठी काम करून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पक्षाचे कार्य पोहचवाल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आले. विठ्ठल पाटील, मुकुंद पुजारी, आनंदराव साने, सुभाष कोरे, शिवाजी खोंदरे, रवींद्र शहापुरे  मेजर सुनील पाटील, उमेश शंभूशेट्टी, सुदर्शन माळी, महेश देवताळे  उदय  शिर्टीकर,महावीर तकडे, राजेंद्र फल्ले आदी उपस्थित होते यावेळी


भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी पोपट पुजारी