बातम्या

लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाडने खरेदी केली नवी गाडी

Popular singer Kartiki Gaikwad bought a new car


By nisha patil - 8/19/2023 5:03:30 PM
Share This News:



सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाड  सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने नवी गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावर गाडी विकत घेतानाचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी घेतली आहे. अभिनेत्रीने महागडी गाडी खरेदी केली आहे.
 कार्तिकी गायकवाडने गाडी खरेदी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'घरातील नवीन सदस्य' असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. सेलिब्रिटींसह चाहते कमेंट्स करत गायिकेला शुभेच्छा देत आहेत. अभिनंदन, याचसाठी केला होता अट्टाहास, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

कार्तिकी गायकवाड सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आता तिच्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या कुटुंबियांसोबत दिसत आहे. कार्तिकीचा पती रोनित, आई-वडील, भावंड यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यही या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. गायकवाड कुटुंबियांनी गाडी घेतल्याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा भाऊ गाडीची पूजा करताना दिसत आहे.


लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाडने खरेदी केली नवी गाडी