शैक्षणिक
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक बैठक
By nisha patil - 11/3/2025 3:14:20 PM
Share This News:
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक बैठक
कोल्हापूर, दि. 11 : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत सातव्या वेतन आयोगातील सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करणे, रिक्त पदे भरणे, अर्जित रजेचे रोखीकरण, वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करणे अशा महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.
मंत्री महोदयांनी या विषयावर सकारात्मक भूमिका घेत महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न महिन्याच्या अखेरीस मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. बैठकीस आमदार निरंजन डावखरे, आमदार राजेश राठोड, तसेच शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक बैठक
|