बातम्या

प्रभासने राम मंदिरासाठी दिली 50 कोटी रुपयांची देणगी

Prabhas donates Rs 50 crore for Ram temple


By nisha patil - 1/20/2024 7:20:41 PM
Share This News:



प्रभासने राम मंदिरासाठी दिली 50 कोटी रुपयांची देणगी

 अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. अशातच आता दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने  राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी 50 कोटी रुपये दान केल्याची चर्चा आहे. तसेच या सोहळ्यादरम्यान जेवणाचा खर्चही अभिनेता उचलणार असल्याचं म्हटलं जात आहे.

'सालार'आधी  प्रभासचा 'आदिपुरुष' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात प्रभास रामाच्या भूमिकेत होते. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. पण आता प्रभास एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

प्रभासने राम मंदिरासाठी 50 कोटी रुपयांची देणगी दिल्याची चर्चा आहे. तसेच आंध्र प्रदेशचे  आमदार चिरला जग्गिरेड्डी यांनी दावा केला होता की, प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान प्रभास जेवणाचा सर्व खर्च उचलेल.  माहितीनुसार, प्रभासने राम मंदिरासाठी 50 कोटी रुपये दान केल्याची बातमी खोटी आहे. अफवा पसरवल्या जात आहेत. तो जेवणाचा खर्च उचलणार हीदेखील खोटी बातमी आहे. तर दुसरीकडे 'हनुमान'च् रिलीजआधी चिरंजीवीने घोषणा केली होती की, सिनेमाच्या प्रत्येक तिकीटावरचे पाच रुपये राम मंदिरासाठी दान करणार". अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. यात अमिताभ बच्चन, कंगना रनौत, टायगर श्रॉफ, माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अजय देवगन, रजनीकांत, धनुष, यश, प्रभास, राम चरणसह अरुण गोविल, दीपिका चिखलियासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. प्रभासचा 'सालार' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. जगभरात या सिनेमाने 700 कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा घरबसल्या पाहू शकतात. 'सालार'नंतर सुपरस्टार 'द राजा साब' या भयपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच 'सालार 2', 'कल्कि 2898 एडी' आणि 'स्पिरिट' हे प्रभासचे आगामी सिनेमे आहेत.


प्रभासने राम मंदिरासाठी दिली 50 कोटी रुपयांची देणगी