बातम्या

सर्जनशीलतेबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान वाढवा : डॉ. संजय डी. पाटील

Practical knowledge along with creativity Raise Dr Sanjay D Patil


By nisha patil - 10/21/2023 1:32:59 PM
Share This News:



सर्जनशीलतेबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान 
वाढवा : डॉ. संजय डी. पाटील

 

-डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

कसबा बावडा/ वार्ताहर  आर्किटेक्च क्षेत्र हे खूपच व्यापक असून आपल्या दैनंदिन जीवनातील फर्निचरच्या डिझाइनपासून ते टाउन प्लानिंगपर्यत सर्व कामामध्ये आर्किटेक्टची भूमिका महत्वपूर्ण असते. आर्किटेक्चर व बांधकाम क्षेत्रातील शिक्षण घेत असताना सर्जनशीलतेबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञानाचा पाया भक्कम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी केले.

    डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थी व पालकाना मार्गदर्शन करताना डॉ. पाटील बोलत होते.  या क्षेत्रात उच्च प्रतीचे ज्ञान मिळवून विद्यार्थ्यानी स्वत:चे व सास्थेचेही नाव मोठे करावे असे आवाहन त्यानी यावेळी केले.

      डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक  डॉ. ए. के. गुप्ता यांनी स्वायत्त  महाविद्यालयाचे महत्त्व,   राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहली,  विद्यापीठ परीक्षेमध्ये झळकलेले गुणवंत विद्यार्थी,  अनुभवी प्राध्यापक वर्ग व प्लेसमेंट सेल याबाबत सविस्तर माहिती दिली.  प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे यांनी प्रास्ताविकामध्ये विविध करिअर संधीची माहिती दिली.  आर्किटेक्चर विभाग प्रमुख  प्रा. इंद्रजीत जाधव यांनी संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम,  परीक्षा तसेच विविध उपक्रम याची माहिती प्रेझेंटेशनद्वारे दिली.  

    प्रा. निराली गिलबिले व प्रा. रसिका  हावळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सीएचआरओ श्रीलेखा साटम,  रजिस्ट्रार  डॉ. एल. व्ही. मालदे,   ऍडमिशन विभाग प्रमुख  प्रा. रवींद्र  बेन्नी,  माजी विभाग प्रमुख  प्रा. रवींद्र सावंत,  तळसंदे आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्रा.  सी. एस.  दूदगीकर,  क्रीडा व जिमखाना प्रमुख डॉ. राजेंद्र रायकर,  सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राहुल पाटील,  एनसीसी प्रमुख डॉ. राहुल महाजन,  अभियांत्रिकी प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. नवनीत  सांगले,  आयक्यूएसी प्रमुख डॉ. संतोष डी. भोपळे, तसेच  आर्किटेक्चर  विभागाचे सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कसबा बावडा : प्रथम वर्ष आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना डॉ. संजय डी. पाटील.
 


सर्जनशीलतेबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान वाढवा : डॉ. संजय डी. पाटील