बातम्या

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ज्यामध्ये गर्भवती महिलांना मिळणार 5000 हजार रुपयांची आर्थिक मदत

Pradhan Mantri Matrutva Vandana Yojana in which pregnant women will get financial assistance of Rs5000 thousand


By nisha patil - 7/16/2024 9:14:32 PM
Share This News:



पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचे सरकार महिला सक्षमीकरणाला  मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे सरकारतर्फे विशेषत: महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. अशातच केंद्र सरकारकडून देशातील गरोदर महिलांना लाभ मिळावा यासाठी सरकार 2017 पासून पंतप्रधान मातृत्व वंदना योजना  राबवत आहे. या योजनेतंर्गत गरोदर महिलांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी महिलांना अर्ज करावा लागतो. सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना चालवल्या जातात. परंतु, त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ज्यामध्ये गर्भवती महिलांना 5000 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळते. आपल्या देशात रोजंदारीवर काम करणाऱ्या स्त्रिया गरोदरपणातही कामावर जातात, असं दिसून येतं. त्यामुळे अशा महिलांना आर्थिक सहाय्य करून गरोदरपणात आराम मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
दरम्यान, या योजनेअंतर्गत ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे किंवा जे बीपीएल कार्डधारक आहेत किंवा ज्या महिला अनुसूचित जाती-जमातीतील आहेत, त्यांना लाभ दिला जातो. ई-श्रम कार्ड धारण केलेल्या महिला. किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी. मनरेगा जॉब कार्डधारक महिलांनाही या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो


प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ज्यामध्ये गर्भवती महिलांना मिळणार 5000 हजार रुपयांची आर्थिक मदत