बातम्या

प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Prajakta Malis new movie


By nisha patil - 8/19/2023 5:06:03 PM
Share This News:



मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी  सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या आगामी  सिनेमाचं नाव 'तीन अडकून सीताराम' असं आहे. आगामी सिनेमाची घोषणा करत सिनेमाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 

प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या 'तीन अडकून सीताराम' या सिनेमाच्या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टर शेअर करत तिने खास कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं आहे,"हे तीन जण तर मजबूत अडकलेत आणि आता तुम्हालाही अडकवायला येतायत कोण? कधी? कुठे? कसे? कळेलच... 'तीन अडकून सीताराम' 29 सप्टेंबरपासून फक्त चित्रपटगृहात". अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत तिला आगामी सिनेमासाठी शुभेच्छा देत आहेत. अभिनंदन आणि शुभेच्छा, चला लंडनमधील शूट अखेर प्रेक्षकांसमोर येणार, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. प्राजक्ता माळीचा बहुचर्चित 'तीन अडकून सीताराम' हा सिनेमा येत्या 29 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तीन अडकून सीताराम' हा कोल्हापूरातील एक वाक्प्रचार आहे. अर्थात याचा अर्थ प्रेक्षकांना हा सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल. हटके नाव आणि प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत असल्यामुळे या सिनेमाची सिनेप्रेमींना उत्सुकता आहे.


प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला