बातम्या
प्रकाश आंबेडकरांना I.N.D.I.A. आघाडीत घ्यायचं की नाही, शरद पवारांनी निर्णय
By nisha patil - 12/25/2023 7:04:55 PM
Share This News:
प्रकाश आंबेडकरांना I.N.D.I.A. आघाडीत घ्यायचं की नाही, शरद पवारांनी निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या I.N.D.I.A. आघाडीच्या समावेशाबाबत मोठं भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांना I.N.D.I.A. आघाडीत घ्यायचं की नाही याबाबत मतमतांतरं असताना, शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं. शरद पवार म्हणाले, "प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार
त्यावेळी मी स्वत: प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घ्यायला हवं असं मत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगितलं"
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष India आघाडीमध्ये सहभागी करून घेत नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. अद्यापही इंडिया आघाडीत वंचितला सहभागी करून घेण्यासंदर्भात कुठली भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस घेत नसल्याचे किंवा कळवत नसल्याचं वंचित बहुजन आघाडीकडून सांगितलं होतं. आम्ही अजूनही इंडिया आघाडीकडून आम्हला सोबत घेतलं जाईल अशी अपेक्षा करत आहोत असं वंचित बहुजन आघाडीकडून काही महिन्यांपूर्वी म्हटलं होतं.
तिकडे सुजात आंबेडकर यांनी नांदेडमधील कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निर्धार मेळाव्यात I.N.D.I.A. आघाडीवर तुफान हल्ला चढवला होता. तुम्हाला संधी दिली होती पुन्हा रडत येऊ नका.. पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू, असं सुजात आंबेडकर म्हणाले. "काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर अजूनही काँग्रेसने अजूनही निर्णय घेतला नाही. त्यावर सुजात आंबेडकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
प्रकाश आंबेडकरांना I.N.D.I.A. आघाडीत घ्यायचं की नाही, शरद पवारांनी निर्णय
|