विशेष बातम्या

लाकूड ओढणे शर्यतीत ओपन गटात प्रकाश तळप यांचा बैल प्रथम समान वेळमुळे प्रथम क्रमांकाचा चिठ्ठी टाकून निर्णय

Prakash Talaps bull first in open group in wood pulling race Decision by casting the first numbered ticket due to equal time


By nisha patil - 1/6/2023 6:56:50 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी -(विनोद शिंगे) येथील इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने कर्नाटक बेंदूर सणानिमित्त आयोजित लाकूड ओढण्याच्या शर्यतीत बुधवारी झालेल्या ओपन गटात दोन बैलांनी 35.5 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. त्यामुळे चिठ्ठी टाकून शर्यतीचा निकाल घोषित करण्यात आला. त्यामध्ये प्रकाश नितीन तळप यांच्या बैलाने प्रथम तर महंतेश अनिल पाटील यांच्या द्वितीय क्रमांक मिळविला. तर निलेश गजानन घोडके यांच्या बैलाने 36.0 सेकंद अशी वेळ नोंदवत तृतीय क्रमांक मिळविला.
डीकेटीई नारायणमळाच्या पटांगणावर बुधवारी ओपन गटातील लाकूड ओढण्याच्या शर्यती पार पडल्या. यावेळी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे, दैनिक राष्ट्रगीतचे संपादक आबा जाधव, पै. अमृत भोसले यांनी मैदानास भेट दिली. तर स्वतंत्र आरटीओ कार्यालय एमएच 51 मंजूर करुन आणल्याबद्दल बेंदुर कमिटीच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे आणि नुतन पोलिस उपअधिक्षक समीरसिंग साळवे यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे प्रकाश तळप आणि महंतेश पाटील यांच्या बैलांनी 35.5 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. त्यामुळे प्रथम क्रमांक कोणाला याची उत्सुकता लागली होती. अखेर चिठ्ठी टाकून याचा निर्णय करण्यात आला. गावभाग ठाण्याचे पोलिस निरिक्षक राजू ताशिलदार यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली आणि त्यामध्ये तळप यांच्या बैलास प्रथम व पाटील यांच्या बैलास द्वितीय क्रमांक जाहीर करण्यात आला.
सकाळी शर्यतीचा प्रारंभ आदित्य स्वप्निल आवाडे, ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, इचलकरंजी मर्चंटस् बँकेचे उपाध्यक्ष गजानन लोंढे, प्रगतशील शेतकरी बापूसो पाटील, अशोक चनविरे, जयपाल बेडक्याळे यांच्या हस्ते मैदानाचे व लाकडाचे पुजन करण्यात आले. शर्यत पाहण्यासाठी कालच्या पेक्षा आज तरुणाईने प्रचंड संख्येने हजेरी लावली होती. ओपन गटातील प्रथम क्रमांकास 1 लाख रुपये शिल्ड व चांदीची फिरती गदा, द्वितीय क्रमांकास 75 हजार रुपये व शिल्ड आणि तृतीय क्रमांकास 51 हजार  व शिल्ड अशी बक्षिसे दिली आहेत. 5 जून रोजी पारंपारिक कर तोडण्याच्या दिवशी सर्वच विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत.
यावेळी स्वप्निल आवाडे, डॉ. राहुल आवाडे, इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदू पाटील, खजिनदार अहमद मुजावर, राजेंद्र बचाटे, राहुल घाट, नितेश पोवार, मलकारी लवटे, तात्या कुंभोजे, सागर कम्मे, तात्या कुंभोजे, वासिम बागवान, शांताप्पा मगदूम, राजू चनविरे, किशोर पाटील, सागर मगदूम, बजरंग कुंभार, राजू दरीबे, बाबासो पाटील, तानाजी भोसले, सागर गळदगे, किशोर निंबाळकर, इरफान अत्तार, नितीन वाघमोरे आदींसह असंख्य शर्यतप्रेमी उपस्थित होते.


लाकूड ओढणे शर्यतीत ओपन गटात प्रकाश तळप यांचा बैल प्रथम समान वेळमुळे प्रथम क्रमांकाचा चिठ्ठी टाकून निर्णय