मनोरंजन

प्रशांत दामले यांचे ओटीटीवर पदार्पण

Prashant Damle debuts on OTT


By nisha patil - 6/28/2023 12:16:39 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम :  हलकीफुलकी कौटुंबिक कॉमेडी सीरिज ‘एका काळेचे मणी’चा प्रीमिअर नुकताच जिओ सिनेमावर झाला आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले प्रमुख भूमिकेत आहेत. अशा तऱहने प्रशांत दामले यांचे वेब सीरिज क्षेत्रात पदार्पण झाले आहे.

‘एका काळेचे मणी’मध्ये पिढय़ांमधील संघर्षाबरोबरच परंपरागत मध्यमवर्गीय विचारांचे पालक, मुलांची आधुनिक जीवनशैली यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. अतुल केळकर यांनी दिग्दर्शित केलेल्या वेब सीरिजमध्ये पौर्णिमा मनोहर, ऋता दुर्गुळे, समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांच्याही भूमिका आहेत.


प्रशांत दामले यांचे ओटीटीवर पदार्पण