बातम्या

प्रथमेशला लागली क्षितीजाच्या प्रेमाची हळद

Prathamesh fell in love with Kshitija


By nisha patil - 2/22/2024 4:26:59 PM
Share This News:



प्रथमेशला लागली क्षितीजाच्या प्रेमाची हळद

टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परब हा लवकरच त्याची गर्लफ्रेंड  हीच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतेच त्याच्या हळदीचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केलेत. तसेच त्याची होणारी पत्नी क्षितीजा हीचा देखील मेहंदी सोहळा पार पडला. क्षितीजाने तिच्या हातावर प्रथमेशच्या नावाची मेहंदी काढली. प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. 

काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी प्रथमेश आणि क्षितिजाचा साखरपुडा संपन्न झाला होता. त्यानंतर आता त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली असून 24 फेब्रुवारी रोजी ते दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रथमेश परब आणि क्षितिजाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत साखरपुडा आणि लग्नाची तारीख जाहीर केली होती. प्रथमेशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याच्या लग्नाविषयी माहिती दिली होती. तसेच यावेळी त्याने त्याच्या साखरपुड्याची तारीख आणि लग्नाची तारीख सांगितली होती. त्यानुसार प्रथमेश परबने 14 फेब्रुवारी ही त्याच्या साखरपुड्याची तारीख आणि 24 फेब्रुवारी ही त्याच्या लग्नाची तारीख सांगितली होती.

अभिनेता प्रथमेश परबसाठी व्हॅलेंटाईन डे खूपच खास आहे. यासंदर्भात त्याने खास पोस्टदेखील शेअर केली होती. त्याने लिहिलं होतं,'व्हॅलेंटाईन डेचं आमच्या रिलेशनमध्ये विशेष स्थान आहे. म्हणजे आमचा या कंसेप्टवर विश्वास नाही. पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टी खूप खास बनतात. 14 फेब्रुवारी 2020 रोजी मी क्षितिजाची व्हॅलेंटाईन डे स्पेशल सीरिज पाहिली आणि तिला मेसेज केला होता. 14 फेब्रुवारी 2021 रोजी आम्ही रिलेशनमध्ये आलो. 14 फेब्रुवारी 2022 रोजी आमच्या रिलेशनला एक वर्ष पूर्ण झालं. 14 फेब्रुवारी 2023 रोजी आम्ही आमचं रिलेशन जगजाहीर केलं. त्यामुळे आम्ही 14 फ्रेब्रुवारी रोजी साखरपुडा केला आहे


प्रथमेशला लागली क्षितीजाच्या प्रेमाची हळद