बातम्या

विवेकानंद कॉलेजच्या प्रतिक्षा जाधवला मल्होत्रा विकफिल्ड स्कॉलरशिप प्राप्त

Pratiksha Jadhav of Vivekananda College received the Malhotra Wickfield Scholarship


By nisha patil - 7/10/2024 10:26:18 PM
Share This News:



 येथील विवेकानंद महाविदयालयातील बी.एस्सी.भाग 2 बायोटेक्नॉलॉजी (एंटायर) ची विद्यार्थिनी कु. प्रतिक्षा वसंत जाधव हिला मल्होत्रा विकफिल्ड फौंडेशन, पुणे यांचेतर्फे बी.एस्सी.अभ्यासक्रमाकरीता प्रती वर्षी रुपये 12,000/- प्रमाणे तीन वर्षासाठी स्कॉलरशिप मंजूर झाली. या यशाबद्दल तिचा जेष्ठ् शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते पुणे येथे  प्रमाणपत्र व स्कॉलरशिप चेक देऊन सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी अभिनंदन केले.

सदर स्कॉलरशिप ग्रामिण भागातून कमी उत्पन्न्‍ गटाच्या शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्यांना बायोटेक्नॉलॉजी विषया संदर्भात मुलाखत घेऊन देणेत येते. सदर विद्यार्थिनीस विभागातील प्रा. कु. विनया मोरे  विभागप्रमुख प्रा. एस.जी.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.


विवेकानंद कॉलेजच्या प्रतिक्षा जाधवला मल्होत्रा विकफिल्ड स्कॉलरशिप प्राप्त