राजकीय

लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू

Preparations for the Lok Sabha elections are underway


By nisha patil - 7/13/2023 7:35:29 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार तयारी असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने ही जय्यत तयारी सुरू केली आहे राज्यातील 36 जिल्ह्यात सुमारे एक लाख मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी दोन लाख नवीन दाखल करण्यात आले आहेत प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांकडे या ईव्हीएम सोपविण्यात आल्या असून आता प्राथमिक स्तरावर राज्य निवडणूक आयोगाने त्यांची चाचणी सुरू केली आहे सध्या राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळात लोकसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून हालचाली सुरू आहेत सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 26 मे 2024 रोजी संपत आहे त्यापूर्वी निवडणुका होऊन नवी लोकसभा अस्तित्वात होईल 1.57 लाख एकूण युनिट निवडणूक साठी तयार करण्यात आली आहेत या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाल्याने राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले


लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू