बातम्या

महापालिका शाळांमधील सुविधा वाढवण्यासाठी ‘ऍक्शन प्लॅन’ तयार करा – आपची मागणी

Prepare an action plan to increase facilities in municipal schools


By nisha patil - 7/3/2025 10:56:48 PM
Share This News:



महापालिका शाळांमधील सुविधा वाढवण्यासाठी ‘ऍक्शन प्लॅन’ तयार करा – आपची मागणी

कोल्हापूर – दिल्ली महानगरपालिकेच्या शाळांप्रमाणेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आधुनिक सुविधा आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी आम आदमी पार्टीने (आप) पाठपुरावा सुरू केला आहे.

महानगरपालिका शाळांची सद्यस्थिती सुधारण्यासाठी आपच्या वतीने शाळांमध्ये जाऊन भौतिक सुविधांचा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला. त्यानंतर महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 54 शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत बैठक झाली होती.

महापालिका प्रशासन व आप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक

बैठकीत शाळांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, नवीन वर्गखोल्या, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, अतिक्रमण, क्रीडा साहित्य यासंदर्भातील चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपायुक्त पंडित पाटील होते.

शाळा प्रशासन अधिकारी आर. व्ही. कांबळे यांनी सांगितले की, महानगरपालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू आहे. तसेच, स्वच्छता आणि खरमाती व्यवस्थापनासाठी विशेष मोहीम राबवावी, तसेच महापालिकेच्या सर्व संबंधित विभागांनी शाळांसाठी ‘ऍक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी मागणी आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली.

आप शिष्टमंडळाच्या महत्त्वपूर्ण मागण्या:

  • शाळांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात राखीव ठेवावा.
  • ओपन बार बंद करण्यासाठी पोलिसांचे सहकार्य घ्यावे.
  • समग्र शिक्षण अभियानांतर्गत निधीची मागणी करावी.
  • महिला व बालकल्याण विभागाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवावेत.

यावर उपायुक्त पंडित पाटील यांनी सांगितले की, मुख्याध्यापकांकडून आलेल्या मागण्यांचा अभ्यास करून पुढील आठवड्यात आणखी एक बैठक घेऊन कामाचे नियोजन केले जाईल.

या बैठकीस शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, संजय नलवडे, उमेश वडर, मयूर भोसले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, उपशहर अभियंता रमेश कांबळे, कनिष्ठ अभियंता दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.


महापालिका शाळांमधील सुविधा वाढवण्यासाठी ‘ऍक्शन प्लॅन’ तयार करा – आपची मागणी
Total Views: 29