बातम्या
मधापासून घरीच तयार करा खोकल्याचं सिरप
By nisha patil - 6/2/2024 2:48:13 PM
Share This News:
हिवाळ्यात अनेकांना खोकल्याची समस्या होत असते. वातावरण बदलामुळे ही समस्या अधिक जास्त जाणवते. वातावरण बदलाचा सगळ्यात जास्त प्रभाव इम्यून सिस्टीमवर पडतो. अशात लोकांना सर्दी, खोकला, घशात खवखव, फ्लूसारखी लक्षणं दिसू लागतात.
सगळ्यात जास्त त्रास खोकल्यामुळे होतो.
खोकला ही तशी सामान्य समस्या आहे. पण त्यामुळे दिवसभरातील कामे रखडतात. खासकरून अस्थमा किंवा श्वासासंबंधी पीडित रूग्णांना खोकल्याने जास्त त्रास होतो. जर कोरडा खोकला असेल तर अजूनच समस्या होते.
खोकल्यासाठी प्रत्येक वेळी औषध घेणं योग्य नाही. खोकला दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायही करू शकता. अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर Dr. Joseph Mercola यांनी घरच्या घरी खोकल्यासाठी सिरप बनवण्याचा फंडा सांगितला आहे. ज्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल.
खोकल्याचा बेस्ट उपाय मध
डॉक्टरांनुसार, खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी मधाचा वापर करू शकता. ते म्हणाले की, अनेकजण आरोग्यासंबंधी समस्या दूर करण्यासाठी मधाचा वापर करण्यासाठी सांगतात. मधात अनेक अॅंटी-बायोटिक तत्व असतात जे खोकला दूर करण्यास मदत करतात.
खोकला कसा दूर करतं मध?
डॉक्टरांनी सांगितलं की, मधात अॅंटी-माइक्रोबियल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. हेच कारण आहे की, मधामुळे खोकल्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांपेक्षा सुरक्षित आणि प्रभावी ठरतं.
खोकल्याचं सिरप बनवण्याचं साहित्य
1/2 चमचा लिंबूची साल
1/2 आल्याची मूळं
1 एक पाणी
1/2 कप लिंबाचा रस
असं बनवा खोकल्याचं औषध
- एका भांड्यात लिंबाची साल, आल्याचे तुकडे आणि एक कप पाणी टाकून 5 मिनिटे गरम होऊ द्या.
- गरम झाल्यावर ते एका कपमध्ये भरा आणि पॅनमध्ये एक कप मध टाका.
- मध हलक्या आसेवर गरम करा आणि त्यात लिंबू व आल्याचं मिश्रण टाकून थोडं घट्ट सिरप बनवा.
- हे मिश्रण एका भांड्यात स्टोर करा आणि गरज लागेल तेव्हा सेवन करा.
मधापासून घरीच तयार करा खोकल्याचं सिरप
|