बातम्या

महावीर गार्डनच्या सुशोभीकरणासाठी विकास आराखडा तयार करा – आमदार राजेश क्षीरसागर

Prepare development plan for beautification of Mahaveer Garden


By nisha patil - 2/21/2025 5:42:33 PM
Share This News:



महावीर गार्डनच्या सुशोभीकरणासाठी विकास आराखडा तयार करा – आमदार राजेश क्षीरसागर

महापालिका अधिकाऱ्यांसमवेत मॉर्निंग वॉक; नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या

कोल्हापूर, दि. २१ – शहरातील महावीर गार्डन हे नागरिकांसाठी महत्त्वाचे ठिकाण असून, त्याच्या देखभालीसाठी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. या उद्यानाचे सुशोभीकरण करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

आज सकाळी आमदार क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत मॉर्निंग वॉक करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी महिलांसाठी ओपन जिम, नैसर्गिक ट्रॅक, नवीन झाडे लावण्याची गरज, तसेच उद्यानातील इतर सुविधा तातडीने सुधारण्याच्या सूचनाही दिल्या.

महावीर गार्डन हे जिल्हाधिकारी कार्यालय, उद्योग भवन आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयाजवळ असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसाठीही हक्काचे ठिकाण आहे. संध्याकाळी लहान मुलांसाठी येथे 'किडझोन' तयार होतो, तर तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे एक जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. त्यामुळे त्याच्या सुशोभीकरणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.

बैठकीस उपस्थित:
माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जेष्ठ नागरिक अनिल शिंदे, जयेश कदम, राहुल देसाई, संगिता कलशेट्टी, सुरेंद्र सुर्वे, बाजीराव निकम, प्रकाश ओसवाल, सतीश शहा आदी नागरिक उपस्थित होते.


महावीर गार्डनच्या सुशोभीकरणासाठी विकास आराखडा तयार करा – आमदार राजेश क्षीरसागर
Total Views: 41