बातम्या

आरटीई अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळा काढून टाकण्याच्या तयारीत..

Preparing to remove the students studying under RTE


By nisha patil - 6/14/2024 8:21:04 PM
Share This News:



शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. आठवीनंतर विद्यार्थ्यांना नववीत शाळेचे शुल्क भरून पुढील शिक्षण घ्यावे लागते.इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळेत आठवीनंतर आरटीई प्रवेशित विद्यार्थ्याला प्रवेश देणे बंधनकारक आहे. परंतु, काही शाळांनी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या आणि आठवीपर्यंत शिकलेल्या विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे.विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी सक्ती करत आहेत. भोसरी परिसरातील एका सीबीएसई बोर्डाच्या नामांकित शाळेने आरटीई अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून नववीत गेलेल्या विद्यार्थ्यांचा दाखला टपालाने घरी पाठवला आहे. तसेच त्याला प्रवेश देण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे.


आरटीई अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळा काढून टाकण्याच्या तयारीत..