बातम्या
कोरगांवकर हायस्कूलमध्ये योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
By nisha patil - 6/21/2024 6:35:17 PM
Share This News:
येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगांवकर हायस्कूल,कोल्हापूर मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रात्यक्षिके सादर करण्यात आली योग प्रशिक्षक सदाशिव हाटवळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना या प्रात्यक्षिकात सहभागी करून घेतले .दंडासन, ताडासन, वृक्षासन याबरोबरच बैठ्या योगाचे सतरा आसन प्रकार त्यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतली . मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी योगाचे महत्त्व विशद केले.पर्यवेक्षक बाळासो कागले,सुरेखा पोवार, हेमलता पाटील,मुख्याध्यापक संजय सौंदलगे,राजाराम संकपाळ प्रभू प्रसाद रेळेेकर यांनी प्रात्यक्षिकात सहभाग घेण्याबरोबरच कार्यक्रमाचे संयोजन केले कोरगांवकर हायस्कूलमध्ये योग प्रात्यक्षिकात विद्यार्थ्यां बरोबर शिक्षकांचाही सहभाग होता .
कोरगांवकर हायस्कूलमध्ये योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
|