बातम्या
विवेकानंद कॉलेज मध्ये व्हाईट आर्मीच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन व्याख्यान व प्रात्यक्षिके सादर
By neeta - 1/30/2024 12:28:20 PM
Share This News:
कोल्हापूर दि. 30 : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे ज्युनिअर सायन्स विभाग, एन.सी.सी. व एन.एस.एस. यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय हॉलमध्ये व्हाईट आर्मी ग्रुप चे व्यवस्थापक मा. प्रशांत शिंदे व त्यांचे सहकारी यांच्या वतीने आपत्ती काळामध्ये समाजाला सुरक्षित पद्धतीने मदत कशी करावी याबाबत आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर व्याख्यान प्रात्यक्षिकासह संपन्न झाले.
दुर्घटनाग्रस्त व्यक्तीची हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत सुरक्षित पद्धतीने काळजी कशी घ्यावी? त्रिकोणी कपडा, नारळाची माळ, लाइफ जॅकेट, दोरखंड तसेच बेशुद्ध अवस्थेत असलेल्या माणसाला स्ट्रेचर नसताना कापड व दोन काठ्या यांच्या आधारे कसे घेऊन जाता येईल? याविषयी सविस्तर माहिती स्वयंसेवक व विद्यार्थ्यांना देण्यात आली. व्याख्यान पद्धतीने सर्व माहिती दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन कसे करावे याबाबत सर्व प्रकारची प्रात्यक्षिके करवून घेतली. महापूर, भूस्खलन व इमारत कोसळले असा आपत्तीवेळी स्वतःची व आपत्ती ग्रस्त व्यक्तीची सुरक्षित मदत कशी करावी हे या व्याख्यान व प्रात्यक्षिकामधून विद्यार्थ्यांना शिकता आले व मनातील सर्व शंकांचे निरसन झाले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. एस पी थोरात गणित विभाग प्रमुख, विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर आर कुंभार त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमप्रसंगी प्रा. एम ए कुरणे, प्रा.डी बी पुजारी, प्रा डॉ. अभिजीत पाटील, प्रा एस एम पाटील, प्रा.सौ.कॅप्टन सुनिता भोसले, प्रा. जे आर भरमगोंडा, प्रा.सौ.चंद्रशीला पाटील, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग तसेच राष्ट्रीय सेवा योजना+२ कार्यक्रम अधिकारी प्रा.श्री. एल एस नाकाडी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. डी. आर. पंडित यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रम कार्यक्रमामुळे सर्वच विद्यार्थ्यांना मानसिक व बौद्धिक बळ मिळाले. कॅडेट श्रुतिका खोत हिने आभार मानले.
विवेकानंद कॉलेज मध्ये व्हाईट आर्मीच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन व्याख्यान व प्रात्यक्षिके सादर
|