बातम्या
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंनी ' या ' दोन राज्यांचे राज्यपाल बदलले
By nisha patil - 10/19/2023 3:50:21 PM
Share This News:
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंनी ' या ' दोन राज्यांचे राज्यपाल बदलले th
ओदिशा आणि त्रिपुरा या दोन राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची केली नियुक्ती
इंद्रसेना रेड्डी नल्लू यांची त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांना ओदिशाचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओदिशा आणि त्रिपुरा या दोन राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे.तेलंगणाचे नेते इंद्रसेना रेड्डी नल्लू यांची त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांना ओदिशाचे राज्यपाल बनवण्यात आलं आहे.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओदिशा आणि त्रिपुरा या दोन राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. तेलंगणाचे नेते इंद्रसेना रेड्डी नल्लू यांची त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांना ओदिशाचे राज्यपाल बनवण्यात आलं आहे. राष्ट्रपती भवनाने बुधवारी, 18 ऑक्टोबर रोजी एक निवेदन जारी करून या दोन राज्यांसाठी नवीन राज्यपालांच्या नियुक्तीची माहिती दिली आहे.
रघुवर दास सध्या भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद सांभाळत आहेत. रघुवर दास यांनी 2014 ते 2019 पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. 1995 मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले रघुवर दास हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणारे झारखंडचे पहिले मुख्यमंत्री होते. रघुवर दास हे ओडिशाचे विद्यमान राज्यपाल गणेश लाल यांची जागा घेतील.
तर तेलंगणातील भाजप नेते आणि सध्या पक्षाचे राष्ट्रीय महासचिव इंद्र सेना रेड्डी नल्लू यांनाही त्रिपुराच्या राज्यपाल पदाची महत्त्वाच्या जबाबदारी देण्यात आली आहे. इंद्र सेना रेड्डी नल्लू हे त्रिपुराचे विद्यमान राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची जागा घेतील.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंनी ' या ' दोन राज्यांचे राज्यपाल बदलले
|