बातम्या

भाज्यांचे दर भिडले गगनाला... !

Prices of vegetables have skyrocketed


By nisha patil - 6/26/2023 4:16:09 PM
Share This News:



हातकणंगले तालुक्यातील कुंभोजच्या बुधवारी आणि रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री  लागली आहे.   पावसाने दिलेली हुलकावणी आणि कडक उन्हाळा यामुळे भाजीपाला पिकवताना शेतकऱ्याला  तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर  खते आणि औषधांचे दर  वाढल्याने  भाज्यांचे दरही वाढल्याचे चित्र सध्या दिसत असून वांगी शंभर ते दीडशे रुपये किलो पोहोचले आहेत, तर गवारी 120 रुपये किलोवर आहे. टोमॅटो व अन्यभाज्या सध्या 60 ते 70 रुपये किलोने विकल्या जात आहेत, त्यामुळे एकूणच बाजारामध्ये भाजीपाला खरेदी विक्रीची उलाढाल मंदावल्याचे चित्र आहे  तारा न्यूज साठी कुंभोजहून विनोद शिंगे


भाज्यांचे दर भिडले गगनाला... !