बातम्या
बाजारपेठेत भाज्यांचे दर गगनाला भिडले, वांगी टोमॅटो गवारीला उच्चांकी दर
By nisha patil - 6/28/2023 12:10:16 PM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) कुंभोज सह परिसरात कधी एकदा पाऊस हजेरी लावतो याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती. बळीराजासुद्धा या नभांकडे पाहताना आस लावून बसला होता. अखेर काही प्रमाणात पाऊस आला आणि सगळेजण खुश झाले. पण, सध्या घरचा हिशोब हाताळणारी मंडळी मात्र काहीशी त्रस्त दिसत आहेत. कारण, दररोजच्या अन्नपदार्थांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भाज्यांचेदर गगनाला भिडले आहेत. बाजारात भाजाचे दरांचा वाढीव आकडा पाहून अनेकजण रिकाम्या हातानंच परतीची वाट धरताना दिसत आहेत.
राज्यातील पावसामुळं एकिकडे उन्हाच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळाला असला तरीही दुसरीकडे मात्र कृषी उत्पन्न बाजार तमिकीमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्यामुळं आणि मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचं नुकसान झाल्यामुळं त्यांच्या बाजारभावांत लक्षणीय वाढ झाली आहे. टोमॅटोचे दर50 ते 55 रुपये किलो असले तरीही भाजीवाल्यांकडे येईपर्यंत हे दर 80 ते 100 रुपे प्रती किलो इतक्या स्तरावर पोहोचल आहेत., घेवडा, मिरची, हिरवा वाटाणा (मटार) या भाज्यांचे दरही 30 – 40 रुपये पाव,कोथींबीर 50रुपये पेडी इतके झाल्याची माहिती मिळत आहे.
. टोमॅटो आणि मिरचीबाबत सांगावं तर, दर दुसऱ्या पदार्थामध्ये वापरली जाणारे हे जिन्नसही शंभरीपार पोहोचले आहेत. होलसेल बाजारात मिरचीचे जर 45 ते 55 रुपये किलो इतके आहेत. तर, किरकोळ बाजारात हेच दर 120 रुपये प्रती किलो इतका आकडा गाठत आहेत. त्यामुळं अनेकांच्याच जेवणातून तूर्तास टोमॅटो, मिरचीही गायब होताना दिसत आहे.
बाजारपेठेत भाज्यांचे दर गगनाला भिडले, वांगी टोमॅटो गवारीला उच्चांकी दर
|