बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अमेरिकेत जंगी स्वागत

Prime Minister Narendra Modi received a warm welcome in America


By nisha patil - 6/22/2023 5:12:10 PM
Share This News:



पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या आजच्या दुस-या दिवशी न्यूयॉर्कमधील योगदिनाचा कार्यक्रम आटोपून ते वॉशिंग्टन डीसीमध्ये  दाखल झाले. तिथे पंतप्रधानांना अमेरिकेन विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देऊन त्यांचं शाही स्वागत करण्यात आलं. यानंतर व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाल्यावरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन  आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. त्यानंतर मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डीनरचे आयोजन करण्यात आले आहे. यात दोघांमध्येही महागड्या आणि खास भेटवस्तूंची देवाणघेवाण होणार आहे. याचबरोबर धूम स्टुडिओ या भारतीय डान्स स्टुडिओच्या संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात मोदींसोबत बायडेन दाम्पत्यही सहभागी होणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अमेरिकेत जंगी स्वागत