बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार अकरा दिवसाचे धार्मिक अनुष्ठान
By nisha patil - 1/13/2024 4:25:31 PM
Share This News:
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार अकरा दिवसाचे धार्मिक अनुष्ठान
नवी दिल्ली : आयोध्यातील प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील 11 दिवस विशेष धार्मिक अनुष्ठान करणार असल्याची माहिती दिली आहे
22 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजल्यानंतर विशिष्ट मुहूर्तावर रामललाच्या विराजमानचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचे मुख्य पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी मोदी यांनी अकरा दिवस धार्मिक अनुष्ठान करणार असल्याचे सांगितले. 22 जानेवारी पर्यंत मोदी यांची उपासना सुरू राहणार आहे. पवित्र सोहळ्याचा साक्षीदार होण्याची आपणास सुदैवाने संधी मिळाली आहे. परमेश्वराने आपल्याला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची आज्ञा दिली आहे. देशवासिनी मला या पवित्र कार्यासाठी आशीर्वाद द्यावेत या कार्यासाठी माझी निवड झाल्याने मला भावना व्यक्त करणे कठीण झाले आहे. आयुष्यात सर्वाधिक भावनिक होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे अशा शब्दात मोदी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार अकरा दिवसाचे धार्मिक अनुष्ठान
|