बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 15 मे रोजी मुंबई दौऱ्यावर

Prime Minister Narendra Modi will visit Mumbai tomorrow on May 15


By nisha patil - 5/14/2024 8:47:49 PM
Share This News:



मुंबईतील उमेदवारांचा प्रचार करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी  उद्या 15 मे आणि 17 मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.  यावेळी नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत मुंबईत रोड शो देखील करणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक मार्ग बंद राहणार आहेत. याबाबत मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांनी माहिती दिली आहे.
 

नरेंद्र मोदी यांचा 15 मे रोजी मुंबईत रोड शो असल्यामुळे उद्या दुपारी 2 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत मुंबईच्या एल.बी.एस मार्ग बंद राहणार आहे. तसेच माहुल घाटकोपर रोडवरील मेघराज जंक्शन ते आर.बी कदम जंक्शन पर्यंत उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूला वाहतूक दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण एल.बी.एस मार्ग व एल.बी.एस मार्ग ला जोडणारा मुख्य रस्त्या पासून 100 मीटर अंतरापर्यंत 14 आणि 15 तारखेला नो पार्किंग करण्यात आला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 15 मे रोजी मुंबई दौऱ्यावर