बातम्या

'प्रिन्स शिवाजी' च्या न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (NIT) काॅलेजला AICTE ची मान्यता

Prince Shivaji New Institute of Technology NIT College recognized by AICTE


By nisha patil - 3/6/2024 6:25:04 AM
Share This News:



राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्थापित महाराष्ट्र शासनाचा 'आदर्श शिक्षण संस्था' पुरस्कार प्राप्त, नॅक A+ व एन.बी.ए. मानांकित श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेच्या उचगांव येथील  न्यू पॉलिटेक्निक काॅलेजमध्ये डिग्री इंजिनिअरिंग कोर्सेस सुरू करण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीकडून अंतिम मान्यता मिळाली. त्याचबरोबर, न्यू पॉलिटेक्निकचे नामांतर आता नव्याने न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (NIT) असे झाल्याची माहिती चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बहुजनांच्या या संस्थेत डिग्री इंजिनिअरिंग काॅलेज सुरू व्हावे ही संस्थेचे पदाधिकारी, सभासद, माजी विद्यार्थी, हितचिंतक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर यांची असलेली बहुप्रतीक्षित इच्छा पूर्ण झाली, असे ते पुढे म्हणाले.

 

गेली ४० वर्षे तंत्रशिक्षणात दीपस्तंभ ठरत हजारो सक्षम अभियंते घडविणाऱे न्यू पॉलिटेक्निक आता नव्या रूपात देशपातळीवर नावलौकिक प्राप्त करेल असा विश्वास अध्यक्ष बी. जी. बोराडे यांनी व्यक्त केला.
उच्चशिक्षित अनुभवी प्राध्यापक, अद्ययावत लॅब, स्मार्ट क्लासरूम, डिजिटल ग्रंथालय, विकासात्मक उपक्रम, औद्योगिक सुसंवाद यातून उद्योगस्नेही अभियंते घडविण्यासोबत आता संशोधन, उद्योजकता विकास, स्टार्टअप निर्मिती, उद्योग प्रायोजित लॅबद्वारे प्रशिक्षण व कन्सल्टन्सी यावर भर देत NIT कोल्हापूर हे उत्कृष्ट शैक्षणिक केंद्र बनविण्याचे ध्येय असेल असे प्राचार्य तथा संस्था विकास अधिकारी डाॅ. संजय दाभोळे म्हणाले.

 

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून NIT कोल्हापूर मध्ये नव्याने मेकॅनिकल ॲन्ड मेकॅट्रॉनिक्स (ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग), इलेक्ट्रिकल इलेक्ट्राॅनिक्स ॲन्ड पाॅवर, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर सायन्स (एआयएमएल) हे उदयोन्मुख कल असलेले डिग्री कोर्सेस तर ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्राॅनिक्स कम्प्युटर, एआयएमएल हे डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध असतील अशी माहिती डॉ. दाभोळे यांनी दिली.
 

या डिग्री काॅलेजच्या मान्यतेसाठी संस्थेचे व्हा. चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजाननीस वाय. एस. चव्हाण यांचे सहकार्य लाभले आणि प्रशासकीय अधिकारी 
संदीप पंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

पत्रकार परिषदेस रजिस्ट्रार डाॅ. नितीन पाटील, विभागप्रमुख सुभाष यादव, संग्रामसिंह पाटील, सुहास देशमुख, बाजीराव राजिगरे, दिपक जगताप, विक्रम गवळी, प्रविण जाधव आदी उपस्थित होते.


'प्रिन्स शिवाजी' च्या न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (NIT) काॅलेजला AICTE ची मान्यता