बातम्या
प्राचार्य डॉ.आर के.शानेदिवाण यांना ज्ञानज्योती संस्थेचा मराठी राजभाषा रत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
By nisha patil - 2/24/2024 3:50:56 PM
Share This News:
प्राचार्य डॉ.आर के.शानेदिवाण यांना ज्ञानज्योती संस्थेचा मराठी राजभाषा रत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
कोल्हापूर: श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांना टाकळीभान जिल्हा अहमदनगर येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा २०२३-२४ चा मराठी राजभाषा रत्न राज्यस्तरीय पुरस्कार नुकता जाहीर झाला आहे.
या पुरस्कारा निवडीबद्दल त्यांचा श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्रशासकीय सहकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ.शानेदिवाण यांनी गेली 28 वर्षे मराठी भाषेची केलेली निरंतर सेवा,मराठी भाषेचा प्रचार व प्रसार आणि मराठी भाषेत केलेले संशोधन याची दखल घेऊन ज्ञानज्योती संस्थेने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे. या पुरस्कार निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ शानेदिवाण यांची 16 पुस्तके प्रसिद्ध झाली असून शंभूराहून अधिक संशोधन पेपर विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी.व पाच विद्यार्थ्यांनी एम. फिल.चे संशोधन कार्य पूर्ण केले आहे.
हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पी. एन. पाटील यांनीही डॉ. आर.के.शानेदिवाण यांचे अभिनंदन केले आहे.
प्राचार्य डॉ.आर के.शानेदिवाण यांना ज्ञानज्योती संस्थेचा मराठी राजभाषा रत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
|