बातम्या
प्रवेशासाठी लाच घेणारे मुख्याध्यापक, लिपिक ACB च्या जाळ्यात; परभणीच्या नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार
By nisha patil - 5/7/2023 4:30:28 PM
Share This News:
प्रवेशासाठी लाच घेणारे मुख्याध्यापक, लिपिक ACB च्या जाळ्यात; परभणीच्या नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार
तारा न्यूज वेब टीम : आजपर्यंत इंग्रजी माध्यमातील शाळांकडून पालकांची लूट होत असल्याचे अनेकदा आरोप झाले. मात्र आता मराठी शाळेत चक्क प्रवेशासाठी लाच मागितली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परभणीतील एका नामांकित अशा बाल विद्या मंदिर शाळेत मुख्याध्यापक आणि कनिष्ठ लिपिकाने पहिलीच्या प्रवेशासाठी लाच मागितल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, त्यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले. तर दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ कच्छवे असे मुख्याध्यापकाचे आणि मोहंमद अब्दुल रफी मोहंमद अब्दुल रशीद असे लाच घेणाऱ्या लिपिकाचे नाव आहे. परभणी शहरातील नानल पेठ परिसरात असलेल्या नामांकित अशा बाल विद्या मंदिर शाळेत पहिल्याच्या प्रवेशासाठी 7 हजार 500 रुपयांची लाच मागण्यात आली. मात्र लाच देण्यास इच्छुक नसल्याने पालकांनी परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. ज्यात कनिष्ठ लिपिक मोहंमद अब्दुल रफी मोहंमद अब्दुल रशीद ECf मुख्याध्यापक एकनाथ कच्छवे यांनी तडजोडीअंती 5 हजार 500 हजारांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार 4000 रुपये तात्काळ अन् 1500 रुपये 2 महिन्यांनी देण्याचे पंचासमक्ष ठरले. ज्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना 4 हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले असून दोघांवरही नानल पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये मोहम्मद अब्दुल रफी मोहम्मद अब्दुल रशीद याने चार हजारांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली. त्यास पथकाने ताब्यात घेतले. यासह मुख्याध्यापक कच्छवे यांनाही एसीबी पथकाने ताब्यात घेतले. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नानलपेठ ठाण्यात सुरु होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली बसवेश्वर जकीकोरे, कर्मचारी मिलिंद हनुमंते, चंद्रशेखर निलपत्रेवार, अतुल कदम, मोहम्मद जिब्राईल यांनी केली.
इंग्रजी शाळेत वेगेवेगळ्या फीच्या नावाखाली लुटमार करण्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहे. मात्र परभणीत चक्क मराठी माध्यम शाळेत लाच मागितल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही लाच थेट मुख्याध्यापकाने लिपिकाच्या मदतीने मागितल्याने पालकांना देखील धक्का बसला आहे. तर यामुळे पालकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
प्रवेशासाठी लाच घेणारे मुख्याध्यापक, लिपिक ACB च्या जाळ्यात; परभणीच्या नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार
|