बातम्या
प्रायव्हेट हायस्कूलचा एस.एस.सी. परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात ---
By nisha patil - 12/7/2024 1:14:33 PM
Share This News:
कोल्हापूर :- जीवनात दोन प्रकारचे संस्कार महत्त्वाचे असतात . घरचे आणि शाळेचे संस्कार. या दोन्ही ठिकाणच्या संस्कारामुळेच यशाचे शिखर गाठू शकलो....असे उदगार मा.डॉ.श्री.राजेंद्र कुलकर्णी.( हेर्लेकर) नेत्र शल्य विशारद ,कोल्हापूर .यांनी येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या शालान्त परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी काढले. हा कार्यक्रम आज गुरुवार दिनांक ११जुलै रोजी दुपारी चार वाजता प्रायव्हेट हायस्कूल येथे रंगमंचावर आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष मा. उदय सांगावडेकर .( चेअरमन नियमक मंडळ दि.प्रा.ए.सोसायटी.) मा डॉ. श्री. सुनील कुबेर . व्हा. चेअरमन नियमक मंडळ दि .प्रा. ए. सोसायटी, कोल्हापूर. प्रकाश मेहता .सदस्य नियमक मंडळ दि.प्रा.ए. सोसायटी, कोल्हापूर. कार्यवाह सौ.शरयू डिंगणकर.हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन आणि संस्थेचे संस्थापक कै. विभूते गुरुजी व कै.अ.वि.जोशी यांच्या पुतळ्याचे पूजन करून स्वागत गीत गायनाने झाली. मा. डॉ. नेहा कुलकर्णी (हेर्लेकर) यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. हा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम प्रशालेमध्ये माजी विद्यार्थी व पदाधिकाऱ्यांनी एस.एस.सी. परीक्षेमध्ये दरवर्षी उल्लेखनीय गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव करण्याच्या उद्देशाने रोख रक्कम देऊन आयोजित करण्यात येतो. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दरवर्षी माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात येते. या माजी विद्यार्थ्यांचा आदर्श नावलौकिक विद्यार्थ्यांच्या समोर सादर करण्याच्या उद्देशाने आमंत्रित करण्यात येते . या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते विशेष गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन गुण गौरव करण्यात आला याप्रसंगी पालकांचेही विशेष स्वागत करण्यात आले.
प्रशालेच प्र.मुख्याध्यापक जी.एस.जांभळीकर.यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. जिमखाना प्रमुख एस. आर.गानबावले .यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. एक आदर्श माजी विद्यार्थी यांनी समाजात मिळवलेला नावलौकिक त्यांचे दातृत्व याबद्दल माहिती विशद केली.याप्रसंगी समारंभ प्रमुख जगदीश जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास दि प्रायव्हेट एज्युकेशन सदस्य अरूण डोंगरे, कार्यवाह एस.आर. डिंगणकर, कोषाध्यक्ष जी. एस. जांभळीकर, पर्यवेक्षक पी.एम. जोशी, जिमखानाप्रमुख एस.आर.गानबावले यांच्यासह सर्व अध्यापक आजी-माजी शिक्षक, विद्यार्थी ,पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन शितल हिरेमठ आणि शुभांगी देसाई यांनी तसेच पारितोषिक प्राप्त विद्यार्थी यादी वाचन बी. एस. जाधव.यांनी केले.कार्यक्रमाची सांगता सीताराम जाधव यांच्या पसायदान सुमधुर गायनाने झाली
प्रायव्हेट हायस्कूलचा एस.एस.सी. परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात ---
|