बातम्या

समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात, 25 जणांचा मृत्यू

Private bus accident on Samriddhi highway


By nisha patil - 1/7/2023 12:30:36 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असलेल्या एका खासगी बसला आज (1 जुलै) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्याची बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी बसमध्ये 33 प्रवासी होते. त्यामधील 25 प्रवासी झोपेतच मृत्यूमुखी पडले. इतर 8 प्रवासी अपघातातून प्राण वाचवण्यात यशस्वी ठरले.

सदर खासगी बस (वाहन क्रमांक MH 29 BE 1819) ही समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याच्या दिशेने येत होती. दरम्यान, बुलडाण्यातील सिंदखेड राजाजवळ बसचं टायर फुटून ती चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. पुढे ती एका खांबाला जाऊन धडकली. यानंतर फरपटत एका छोट्या पुलावर जाऊन आदळली.या धडकेत बसच्या डिझेल टँकवर आघात होऊन ते फुटलं. दरम्यान, ठिणग्याही उडाल्याने बसने पेट घेतला. या आगीतच बहुतांश प्रवाशांना प्राण गमवावे लागले. या अपघातात वाचलेल्या प्रवाशांनी काच फोडून कसाबसा बाहेर प्रवेश मिळवल्याने त्यांना आपले प्राण वाचवता आले, अशी माहिती कडासने यांनी दिली.


समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात, 25 जणांचा मृत्यू