बातम्या
मलकापूर येथे मरीमाई चषक क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न...
By Administrator - 2/17/2025 4:41:28 PM
Share This News:
मलकापूर येथे मरीमाई चषक क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न...
आंबा संघाचा मरीमाई चषकावर कब्जा, मलकापूर इलेव्हन उपविजेता
मलकापूर (ता. शाहूवाडी) येथे शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आशिष लगारे यांच्या आयोजनाखाली झालेल्या मरीमाई चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेत एस. पी. कंस्ट्रक्शन स्पोर्टिंग आंबा यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर मलकापूर इलेव्हन उपविजेता ठरला. मुन्ना देसाई ११ स्पोर्टिंगला तृतीय, तर निनाई विठलाई स्पोर्टिंग करूंगळे संघाला चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस मिळाले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर), मलकापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, तसेच तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मलकापूर येथे मरीमाई चषक क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न...
|