बातम्या
प्रा. दिग्विजय पवार यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी
By nisha patil - 3/28/2024 4:04:16 PM
Share This News:
कोल्हापूर: प्रतिनिधी : वाठार तर्फ वडगाव येथील श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सहाय्यक प्राध्यापक दिग्विजय जोतीराम पवार यांना शिवाजी विद्यापीठाची इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधील पीएचडी पदवी प्राप्त झाली. त्यांनी "अॅन इनसेंबल क्लासिफिकेशन बेस्ड अॅप्रोच फाॅर अॅटोमेटेड ग्लुकोमा डिटेक्शन" या विषयावर प्रबंध सादर केला.
सातारा येथील केबीपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील प्रा. डॉ. युवराज के. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. त्यांना प्रा. डॉ. सुहास पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने, जि. प. माजी सदस्या मनीषा माने, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ. आर. के. सावंत, कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप माने, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, वसुधा पवार, वडील माजी प्राचार्य डाॅ. जे. के. पवार यांचे प्रोत्साहन लाभले.
प्रा. दिग्विजय पवार यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी
|