बातम्या
विवेकानंद कॉलेजच्या प्रा.संदीप पाटील यांना ‘उत्कृष्ठ संपर्क अधिकारी’ पुरस्कार प्राप्त
By nisha patil - 1/3/2024 5:02:39 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजच्या प्रा.संदीप पाटील यांना ‘उत्कृष्ठ संपर्क अधिकारी’ पुरस्कार प्राप्त
कोल्हापूर दि. 1 : जिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर यांचेवतीने सन 2023 मध्ये निवडणूक साक्षरता मंडळांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मताधिकार, लोकशाही यासंबंधी केलेली जनजागृती, त्यासाठी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, नवमतदार नोंदणी इत्यादी कार्याबद्दल विवेकानंद कॉलेजला महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी मा.श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व कोल्हापूर जिल्हा नोडल अधिकारी प्रा.संदीप पाटील यांना उत्कृष्ठ संपर्क अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली श्री संदीप पाटील यांनी निवडणूक साक्षरतेसंदर्भात विविध उपक्रम महाविद्यालयात तसेच कोल्हापूर जिल्हयात राबविले आहेत.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठात पार पडला. यावेळी कोल्हापूर जिल्हयाचे अतिरिक्त् जिल्हाधिकारी मा. संजय शिंदे, पन्हाळा प्रांत अधिकारी मा.समिर शिंगटे, उपजिल्हाधिकारी मा.समाधान शेंडगे, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरु मा. डॉ. पी. एस. पाटील व विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार हे उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळालेबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ मा.कौस्तुभ गावडे, IQAC समन्वयक डॉ.श्रुती जोशी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग, प्रशासकीय कर्मचारी यांनी श्री संदीप पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
विवेकानंद कॉलेजच्या प्रा.संदीप पाटील यांना ‘उत्कृष्ठ संपर्क अधिकारी’ पुरस्कार प्राप्त
|