बातम्या
प्रा. सर्जेराव राऊत यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
By nisha patil - 9/23/2024 6:56:29 PM
Share This News:
प्रा. सर्जेराव राऊत यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या 26 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे कार्य ते करत आहेत. चाटे शिक्षण समूहाच्या कोल्हापूर विभागाचे शैक्षणिक प्रमुख म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सतत काम केले आहे, यामुळे त्यांना इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे आणि माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्यातर्फे हा सन्मान प्रदान करण्यात आला.
प्रा. सर्जेराव राऊत हे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक व प्रशासक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कारकिर्दीतील हा 600 पेक्षा अधिक पुरस्कार आहे. त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करून शिक्षण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण कार्य केले आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित 4 पुस्तके प्रकाशित केली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 125 पेक्षा अधिक विद्यार्थी देश-विदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत.
पुरस्कार मिळाल्यानंतर प्रा. राऊत यांनी आपल्या कुटुंबासोबतच विद्यार्थी, सहकारी आणि मार्गदर्शक प्रा. गोपीचंद चाटे व प्रा. डॉ. भारत खराटे यांना श्रेय दिले.
प्रा. सर्जेराव राऊत यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
|