बातम्या
बिगर शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये वैश्विक दृष्टीकोन निर्माण झाला पाहिजे - प्रा. श्रीकृष्ण महाजन
By Administrator - 1/17/2024 1:59:41 PM
Share This News:
कोल्हापूर - बिगर शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये देशपातळीवरीलदृष्टीकोनाबरोबरच वैश्विक दृष्टीकोन निर्माण झाला पाहिजे. त्यांनी जागतिक पातळीवर ठरविण्यात आलेल्या शास्वत विकासासाठी ठरविण्यात आलेली ध्येय समोर ठेवून आपले नियोजन करणे आवश्यक आहे. स्वयंसेवी संस्था या सामाजिक जाणीवेतून कार्यरत असतात. या संस्थांनी सामाजिक वंचितता व सामाजिक समावेशन म्हणजे काय हे जाणून घेतले पाहिजे. या संस्थांनी आता व्यावसायिक व्यवस्थापनाची तंत्रे आत्मसाद केली पाहिजेत. संस्थांच्या उपक्रमांची पूर्व व कार्योत्तर माहिती लक्षार्थ गटांपर्यंत पोहचली पाहिजे. बिगर शासकीय संस्थांनी व्यवस्थापनाची १४ तत्त्वे समजून घेवून आपल्या नियोजनात्मक आराखडा तयार केला पाहिजे. असे प्रतिपादन अधिष्ठाता प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास
केंद्राच्यावतीने बिगर शासकीय संस्थांसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्यवस्थापन विकास कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी तुषार कामत व रवींद्र कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अविनाश भाले यांनी केले. अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवसभराच्या या व्यवस्थापन विकास कार्यक्रमात एकून तीन सत्रांमध्ये पाच विषयांवर या क्षेत्रातील मान्यवर व तंज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. यामध्ये श्री. अविनाश भाले, श्री. तुषार कामत, श्री. संभाजी पवार, श्री. राजेंद्रकांबळे इत्यादींचा समावेश होता. यांनी बिगर शासकीय संस्थांचे व्यवस्थापन आणि शास्वत विकासाची उद्दिष्टे, बिगर शासकीयसंस्थांसाठी आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत, डिजीटल मार्केटिंग, लेखापरीक्षण आणि आर्थिक व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक स्त्रोतमिळविण्याच्या संधी या विषयांवर मार्गदर्शन केले.
बिगर शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये वैश्विक दृष्टीकोन निर्माण झाला पाहिजे - प्रा. श्रीकृष्ण महाजन
|