राजकीय
जिल्ह्यात मतमोजणी दिवशी विजयी उमेदवारांच्या मिरवणूका काढण्यास मनाई
By nisha patil - 11/22/2024 10:00:24 PM
Share This News:
जिल्ह्यात मतमोजणी दिवशी विजयी उमेदवारांच्या मिरवणूका काढण्यास मनाई
जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून मतमोजणीची प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उद्या निवडणूक निकाला दिवशी विजयी उमेदवाराची विजयी मिरवणुक काढणे, विजयी उमेदवाराचे कार्यकर्ते, कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष, संस्था यांनी गावातून, शहरातून मिरवणूक, रॅली काढणे, सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे अथवा त्याचा वापर करणे व फटाके लावणे, फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात होणारा सार्वत्रिक उपद्रव टाळण्यासाठी देण्यात आलेला हा आदेश दिनांक 23 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रासाठी लागू राहणार आहे.
जिल्ह्यात मतमोजणी दिवशी विजयी उमेदवारांच्या मिरवणूका काढण्यास मनाई
|