बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात 20 ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश लागू

Prohibition order applicable till August 20 in Kolhapur district


By nisha patil - 3/8/2023 6:27:12 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यात काही महिन्यापासून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मिडीयावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवले जात आहेत. त्यावरुन एक जमाव करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने आणि  मोठया प्रमाणात यात्रा, उरुस साजरे होणार आहेत. दरम्यान एखादी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून जातीय तेढ निर्माण होवू नये यासाठी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी. 6 ऑगस्ट  सकाळी 7 वाजल्यापासून ते. 20 ऑगस्ट  रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केले आहेत.


कोल्हापूर जिल्ह्यात 20 ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश लागू